Sunday, August 16, 2026
Homeमुख्य बातम्याभाजपच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढांची फेरनियुक्ती

भाजपच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढांची फेरनियुक्ती

Chandrakant Patil MP Lodha,Chandrakant Patil, MP Lodha,Chandrakant, Patil, MP, Lodha

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आणि मुंबई अध्यक्षपदी इतर नेत्यांना संधी दिली जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र दोन्ही नेते अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

विधानसभा निकालानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची उंचलबांगडी करण्यात येईल अशी चर्चा सुरु होती. अध्यक्षपद बदलण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा सुध्दा झाली होती. मुंबई भाजप अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची निवड करण्यात येईल अशीही चर्चा सुरु होती. मात्र, चंद्रकांत पाटील आणि मंगल प्रभात लोढांची फेरनियुक्ती केल्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments