Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्यामाटुंगा : विकृत तरुणाने तरुणीचं चुंबन घेऊन धूम ठोकली!

माटुंगा : विकृत तरुणाने तरुणीचं चुंबन घेऊन धूम ठोकली!

Matunga Woman Harassment,Matunga, Woman Harassment,Matunga Woman, Harassment,Matunga Harassmentमुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विकृत तरुण रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एका तरुणीचं चुंबन घेऊन पळ काढला.

महिलांची छेडछाड करणा-या विकृताची महिलांनी तक्रार दिली नाही. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. तसेच त्याने हस्तमैथून देखील केलं. महिलांनी विकृताविरोधात तक्रार दिली नाही. अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येऊन एफआयआर दाखल करण्याचं आवाहन केलं आहे.

२५ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर तो आजुबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेतो आणि महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. यानंतर २६ जानेवारीला खान पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी तो जबरदस्ती तिचा किस घेतो आणि पळ काढतो.

यानंतर माटुंगा ब्रिजवर दोन महिला आपापसात बोलताना दिसत आहेत. यावेळी खान त्यांच्यातील एका महिलेला स्पर्श करतो. त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाटी तो मागे वळून पाहतो. पण महिलांना ही गोष्ट लक्षात आलेली नसल्याने त्या बोलण्यात व्यस्त असतात. यानंतर तो त्यांच्याकडे पाहत राहतो. माटुंगा रेल्वे स्थानकावरील सहा आणि सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ब्रीजवर हा प्रकार घडला आहे. सीसीटीव्हीत हे सगळं कैद झालं आहे. हा ब्रीज रात्री सात वाजल्यानंतर निर्मनुष्य असतो त्यामुळे आरोपीने याचा फायदा घेत महिलांचा विनयभंग केला. सीसीटीव्हीत दिसत आहे. आतापर्यंत त्या विकृताने दोन महिलांचा विनयभंग केला आहे. पोलिसांना सापळा रचत चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. त्याची ओळख पटली आहे. पण महिलांनी तक्रार दाखल न केल्याने पोलीस हतबल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments