Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्यामुंबईत तरुणीवर गँगरेप करुन हत्या!

मुंबईत तरुणीवर गँगरेप करुन हत्या!

Woman Gang-Raped, Husband, 2 Others Arrested In Mumbaiमुंबई : मुंबईतही सांताक्रुझ परिसरात एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी तरुणीचे जवळचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.

सांताक्रुझ परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनामुळे सांताक्रुझ परिसरात एकच खळबळ उडाली. मृत तरुणी ही सांताक्रुझमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहायची. तिच्या घराशेजारी एका खोलीत तीन तरुण राहायचे. यापैकी दोघांनी पीडित तरुणीला त्यांच्या खोलीत बोलावलं. तरुणी या तरुणांना ओळखत असल्याने ती त्यांच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यानंतर या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तिला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता यांनी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर या दोन्ही नराधमांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

आणि दार उघडताच तरुणीचा मृतदेह दिसला…

खोलीत राहणारा तिसरा तरुण रात्री घरी आला. दार उघडताच त्याला तरुणीचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ चाळीतील इतर रहिवासी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहिती आणि काही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या दोन्ही नराधमांना अटक केली. या दोघांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments