Saturday, May 9, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईMumbai Local : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local megablockमुंबई : आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकमुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. तर सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवरही लोकल गाड्या थांबतील. डाऊन धीम्या मार्गावर विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशीदरम्यान जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर तसेच बेलापूर ते खारघर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येतील. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments