Sunday, May 10, 2026
Homeमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षेच्या या नव्या तारखा जाहीर

एमपीएससी परीक्षेच्या या नव्या तारखा जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून Mpsc राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

या अगोदर निश्चित करण्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (११ ऑक्टोबर २०२०), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० – (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments