Sunday, May 10, 2026
Homeमुख्य बातम्याकोरोना : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला -  खा. इम्तियाज जलील

कोरोना : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला –  खा. इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel Aurangabad Municipal Corporation,Imtiaz Jaleel, Aurangabad Municipal Corporation,Imtiaz, Jaleel, Aurangabad, Municipal, Corporation

औरंगाबाद : कोरोनाचा आजार पसरण्याच्या भितीमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केली  आहे.

औरंगाबाद महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. परंतु सध्या कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रॅली,सभांमध्ये नागरिक एकत्र येतील त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात. तो पर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमावा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments