Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याडोंबिवलीत ‘ती’ हत्या समलिंगी संबंधातून!

डोंबिवलीत ‘ती’ हत्या समलिंगी संबंधातून!

डोंबिवली : डोंबिवलीत सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गूढ पोलिसांनी अवघ्या नऊ तासांत उकललं. ५३ वर्षीय उमेश पाटील यांची समलिंगी संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी प्रफुल्ल पवार याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. प्रफुल्ल आणि उमेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधांवरुन बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं. उमेशच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून प्रफुल्लने त्याची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरला. डोंबिवली पश्चिमेतील ५२ चाळ परिसरात झुडूपात टाकला होता. त्यानंतर बॅगेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

आरोपी प्रफुल्ल पवारचा काही दिवसांपूर्वी झाला विवाह…

काही दिवसांपूर्वी आरोपी प्रफुल्ल पवार याचा विवाह झाला होता. प्रफुल्लच्या लग्नानंतरही उमेश त्याच्याकडे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र प्रफुल्लने नकार दिल्यामुळे ‘तुझ्या बायकोला सगळं सांगेन’ अशी धमकी तो देत होता. त्यामुळे संतप्त प्रफुल्ल पवार याने हत्या केली. अशी कबूल आरोपीने पोलिसांना दिली अशी माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments