Sunday, May 10, 2026
Homeकोंकणठाणेडोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द

डोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द

ठाणे : कोरोना व्हायरसच्या भितीमुळे डोंबिवली, ठाण्यात यंदा गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

डोंबिवली आणि ठाणे येथील सगळ्या शोभायात्रा कोरोनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. २२ वर्षांची परंपरा यामुळे खंडीत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्याही सगळ्या स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतयात्रा संयोजकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी या शोभायात्रा रद्द केल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments