Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeकोंकणसिंधुदुर्गMaharashtra Vidhan Sabha : भाजपचे नितेश राणेंचा विजय, सेनेच्या सतीश सावंतांचा पराभव

Maharashtra Vidhan Sabha : भाजपचे नितेश राणेंचा विजय, सेनेच्या सतीश सावंतांचा पराभव

Nitesh Raneकणकवली: काँग्रेसमधून भाजपवासी झालेले नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून विजयी झाले. शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभव झाला. यामुळे पुन्हा एकदा राणे फॅक्टर कायम असल्याचे दिसून आले.
नितेश राणे यांच्या पराभवासाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती असताना सुध्दा शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरोधात अधिकृत उमेदवार दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांनी आपला मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी ८० टक्के मत आपल्याला मिळतील असा दावा केला होता.
कणकवलीत काँग्रेसकडून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून राजन दाभोळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments