Tuesday, June 16, 2026
Homeकोंकणरत्नागिरीधक्कादायक : पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले

धक्कादायक : पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.

स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी दापोली तालुक्यात आले होते.

हे पर्यटक आज १८ डिसेंबर दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. दरम्यान, पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments