Sunday, April 12, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी' – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ – मुख्यमंत्री फडणवीस

गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये होणाऱ्या या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगाला मिळणार आंतरराष्ट्रीय व्यासपीठ.

आयआयसीटी मुंबई, गोरेगाव फिल्मसिटी प्रकल्प, देवेंद्र फडणवीस, indian-institute-creative-tech-mumbai

केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारण्यात येणार असून, ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगाला जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे विशेष आभार मानले.

‘वेव्हज् २०२५’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबई ही देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानीपैकी एक आहे. त्यामुळेच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’सारख्या संस्थेची स्थापना येथे होणे ही अभिमानाची बाब आहे. ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात संशोधन व प्रशिक्षण देणार आहे.

या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा राज्य सरकारचा उद्देश असून, हा प्रकल्प महाराष्ट्रापुरता सीमित न राहता त्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवी दिशा मिळेल आणि अनेक नव्या संधी निर्माण होतील.

वेब डेस्क
वेब डेस्क
मुंबई माणूस या मराठी डिजिटल न्यूज पोर्टलच्या एकूण संपादकीय व्यवस्थापन, सामग्री धोरण, प्रकाशन प्रक्रिया, दर्जा नियंत्रण आणि प्लॅटफॉर्म संचालनाची जबाबदारी प्रशासक खाते सांभाळते. विश्वासार्ह, जनकेंद्री आणि निष्पक्ष पत्रकारिता सुनिश्चित करणे हे या खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments