मुंबईतील घाटकोपर परिसरात मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सदर मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपी मुलांनी बळजबरीने शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडीओ मुलीच्या भावाने पाहिला आणि आपल्या नातेवाईकांना त्याबद्दलची माहिती दिली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात झाली असून पुढील तपास सुरु आहे.
Web Title: Ghatkopar yethe matimand mulivar balatkaarachi dhakkadayak ghatana; teen alpavayin mulanna atak