Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात ५ गाड्यांचा विचित्र अपघात

पुण्यात ५ गाड्यांचा विचित्र अपघात

पुणे – पुण्यामध्ये ५ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची ५ वाहनांना धडक बसली. यामध्ये बाईक आणि दोन चारचाकींचा समावेश होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.  अप्पर इंदिरा नगर परिसरातील ही दुर्घटना घडली आहे.  या अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments