Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रसीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : उदय सामंत

सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : उदय सामंत

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २९ मार्चरोजी होणारी सीईटीची परीक्षा ३० एप्रिलला होणार आहेत.ढकलण्यात आली आहे. अशीच परिस्थिती उद्भवल्यास परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाईल. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

कोरोनामुळे राज्यातल्या शाळा,महाविद्यालयं बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मॉल,स्विमिंग पूल, व्यायाम शाळा बंद करण्यात आल्या असून ५० टक्के दुकानं एक दिवसाआड बंद करण्यात येत आहेत. कोरोनामुळे २९ मार्च ला होणारी सीईटीची परीक्षा ३० एप्रिलला होणार असल्याबातचा निर्णय मंत्रालयात एका बैठकीत घेण्यात आला आहे. असंही सामंत यांनी सांगितलं.

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सीबीएसई बोर्डाने सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर ३१ मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे.

 

सं

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments