Sunday, May 10, 2026
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाण दीपिका पदुकोनच्या पाठिंब्याबाबत म्हणाले....

अशोक चव्हाण दीपिका पदुकोनच्या पाठिंब्याबाबत म्हणाले….

Deepika Padukone - Ashok Chavanमुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) मध्ये जे काही झालं त्याविरोधात आता सर्वजण बोलत आहेत. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनाला दीपिका पदुकोन हीनं पाठिंबा देणं यामध्ये मला काहीही चुकीचं दिसत नाही. अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हीनं पाठिंबा दिला. सोशल मीडियावर काही जणांनी समर्थानाचं स्वागत केलं तर काहींनी जोरदार टीका केली. दीपिकाचा आगामी चित्रपट ‘छपाक’ वर बहिष्कार टाका अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. यावेळी तिने हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दीपिका आपला आगामी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. दीपिका विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये पोहोचली होती.सोशल मीडियावर पाठिंब्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments