Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशपती अंघोळ - ब्रश करत नाहीत, पत्नीने मागितला घटस्फोट

पती अंघोळ – ब्रश करत नाहीत, पत्नीने मागितला घटस्फोट

Patna Wife Soni Devi,Patna, Wife, Soni, Devi,Manish,Bihar,Divorce,Husbandपाटणा : पती अंघोळ करत नाही, दातही घासत नाही. माझा पती रोज दात घासत नाही. पती अंघोळ करत नाही. त्यांच्या तोंडातून घाण वास येतो, दहा दिवसांनी एकदा अंघोळ करतो. या गोष्टीमुळे मी कंटाळले आहे. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे अशी तक्रार एका महिलेने केली आहे. या वेगळ्या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

बिहारची राजधानी पाटणामध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने पतीच्या घाणेरड्या सवयींना कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सोनी देवी असे महिलेचे नाव आहे. ही महिला वैशाली जिल्ह्यातील देसरी येथील नया गाव येथे राहणारी आहे. सोनीचे लग्न २०१७ साली मनीष रामशी झाले होते. मला पतीच्या या घाणेरड्या सवयींचा आणि राहणीमानाचा कंटाळा आला असून मला घटस्फोट हवा आहे असा अर्ज सोनीने आयोगाकडे केला आहे.

महिलेने काय सांगितले तक्रारीत…

आपण मनीषला लग्नाआधी कधीच भेटलो नव्हतो असं सोनीने सांगितलं आहे. मनीष सोबत कुटुंबाने लग्न लावून दिले आहे. दोघांनी थेट लग्न मंडपामध्ये एकमेकांना पाहिलं. लग्नानंतर सासरी गेल्यावर पतीच्या या घाणेरड्या सवयींबद्दल समजले. अनेकदा याबद्दल त्याला सांगितले. मात्र मनीष काही ऐकून घेण्यास तयार नव्हता. अशी सोनीची तक्रार आहे. त्यामुळेच घटस्फोटाचा अर्ज केला आहे.

आयोगाचा आंघोळीचा-दात घासण्याचा सल्ला

या प्रकरणात दोघांना आयोगाने दोन महिने एकत्र संसार करत स्वत:च्या वागण्यात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. मनीषने नियमीत अंघोळ करावी आणि दात घासावेत असा सल्लाही आयोगाने त्याला दिला आहे. सोनीला अस्वच्छता आवडत नसल्याने मनीषने स्वत:मध्ये सुधारणा करावी असं आयोगाचं म्हणणं आहे. महिला आयोगातील समोपदेशकांनी या दोघांना घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments