Placeholder canvas
Monday, May 6, 2024
HomeदेशVIDEO : ‘भाग जा रे कोरोना भाग जा’, भजन, पाहा!

VIDEO : ‘भाग जा रे कोरोना भाग जा’, भजन, पाहा!

CoronaVirusमुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही मीम्सही तयार करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ‘गो कोरोना’ चा व्हिडीयो चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यापाठोपाठ आता राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील ‘भाग जा रे कोरोना भाग जा’, भजन, चांगलाच व्हायरलं होत आहे.

राजस्थानमधल्या बिकानेर एका भजनी मंडळानं तर कोरोनावर एक भजन तयार केलं आहे. ‘कोरोना भाग जा, भारतमे तेरा क्या काम रे’, असे या भजनाचे बोल आहेत. आपण एकत्र येत कोरोनोचा सामना करूया असा या भजनाचा आशय आहे. या भजनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारतात आतापर्यंत ७३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी  जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments