Thursday, May 2, 2024
Homeदेशमाझ्यावर आरोप करणा-यांना जोड्याने मारणार; संजय राऊतांचा इशारा

माझ्यावर आरोप करणा-यांना जोड्याने मारणार; संजय राऊतांचा इशारा

नवी दिल्ली : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरमयान शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay raut यांनी बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हटलं आहे. तर याचवेळी त्यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असा इशारा दिला आहे.

“ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत.

अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

 “राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही,” असंही संजय राऊत यांनी सुनावलं.

“ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments