राजकोट : कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. लसीकरणाची तयारी शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते.
“देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. “२०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं,” असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे. २०२१ मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल.
साल 2020 में संक्रमण की निराशा थी, चिंताएं थी, चारों तरफ सवालिया निशान थे।
लेकिन 2021 इलाज की आशा लेकर आ रहा है।
वैक्सीन को लेकर भारत में हर जरूरी तैयारियां चल रही हैं।
– पीएम श्री @narendramodi #AIIMSinGujarat pic.twitter.com/1wDtuRuF68
— BJP (@BJP4India) December 31, 2020
“भारताने योग्य वेळेत पाऊलं उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी करोनाविरोधातील लढाई जिंकली आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. २०२० मध्ये करोनामुळे निराशा होती. चारही बाजूला अनेक प्रश्न होते. पण आता २०२१ नवी आशा घेऊन येत आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

