Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याकेजरीवाल देशद्रोही नसून कट्टर देशभक्त, दिल्लीकरांनी दाखवून दिलं : संजय सिंग

केजरीवाल देशद्रोही नसून कट्टर देशभक्त, दिल्लीकरांनी दाखवून दिलं : संजय सिंग

Arvind Kejriwal Sanjay Singh,Arvind Kejriwal, Sanjay Singh,Arvind, Kejriwal, Sanjay, Singh

नवी दिल्ली : भाजपाने सत्ता,पैसा आणि दिग्गज मंत्र्यांची फौज दिल्ली विधानसभा प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली होती. दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. दिल्लीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आपचे खासदार संजय सिंग यांनी ट्विट करुन आभार मानले.

दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. केजरीवाल हे आतंकवादी आहेत. त्यांचे भरपूर पुरावे आहेत. असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केजरीवाल आतंकवादी आहेत. असा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांचे पाकिस्तानशी कनेक्शन आहेत. असा आरोप केला होता. मात्र आज दिल्लीकरांनी निकालातून त्याचे उत्तर भाजपला दिले आहे.

आपने आता पर्यंत ५९ जागांवर आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे भाजपने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. पुन्हा दिल्लीकरांनी आपला सेवेची संधी दिली हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश सुरु केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments