Tuesday, May 19, 2026
Homeदेशजेएनयू : आईशी घोषवर गुन्हा दाखल; जावेद अख्तर भडकले

जेएनयू : आईशी घोषवर गुन्हा दाखल; जावेद अख्तर भडकले

Javed Akhtarनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हिंसाचार घडले. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिला मारहाण करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी आईशी घोषसह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे प्रसिद्ध गीतकार, कवी जावेद अख्तर संतापले आहेत. ‘राष्ट्रवाद्यां’ ना आव्हान देणारी आईशी घोष हिच्यावर का कारवाई झाली हे समजू शकतो, असा सवाल पोलीस आणि प्रशासनाला विचारला.

आईशी घोष आणि इतर आंदोलकांवर एफआयआर नोंदवल्यानंतर जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. आईशी घोषविरुद्ध एफआयआर का नोंदवला गेला हे समजण्यासारखेच आहे. याचे कारण म्हणजे आईशी राष्ट्रवाद्यांना कसे थांबवू शकते?…

या राष्ट्रविरोधी लोकांनी आमच्या गरीब बिचाऱ्या गुंडांना लाठी सुद्धा नीट चालवू दिली नाही….(लाठी चालवताना) ते (आंदोलक) मध्येच यायचे. त्यांना (आंदोलकांना) हे सहन करणे आवडते हे मला माहिती आहे, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments