Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याडोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमधील झोपड्या दिसू नये म्हणून बांधली भिंत

डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमधील झोपड्या दिसू नये म्हणून बांधली भिंत

Donald Trump Gujarat,Donald Trump, Gujarat,Donald, Trump, अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ फ्रेब्रुवारी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मार्गात त्यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून एक खास भिंत उभारण्यात येते आहे. अहमदाबाद महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात काही झोपड्या आहेत. त्या ट्रम्प यांना दिसू नयेत म्हणून ही भिंत उभारण्यात येते आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मार्गातल्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत बांधली जाते आहे.

महापालिकेने दिलेल्या कामानुसार तूर्तास अर्धा किलोमीटरची भिंत उभारली जाते आहे. या भिंतीची उंची सहा ते सात फूट असणार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांनी कोणत्याही बांधकामाची माहिती नाही, मी असं काहीही बांधकाम पाहिलेलं नाही” असं म्हणत नकार दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments