Tuesday, June 16, 2026
HomeदेशCoronavirus Guidelines l केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स, परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट

Coronavirus Guidelines l केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स, परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट

नवी दिल्ली l केंद्र सरकारकडून कोरोनाबाबत आज बुधवारी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. Coronavirus Guidelines राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे असे केंद्राने म्हटले आहे. तसेच राज्यांना देखरेख, कंटेंटमेंट आणि खबरदारीच्या बाबतीत काटेकोर पालन करावे लागेल. राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट देण्यात आली आहे. केंद्राची ही मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

केंद्राने म्हटले आहे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण आतापर्यंत मिळवलेले यश कायम राखायचे आहे. हे देशातील कमीतकमी सक्रिय प्रकरणांमधून स्पष्ट होते. मात्र, सणासुदीच्या हंगामात आणि काही राज्यांत प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. यासाठी राज्यांना सावधगिरी बाळगावी लागेल आणि कंटेंटमेंट, तसेच उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

सर्व्हिलान्स आणि कंटेंटमेंटसाठी गाइडलाइन्स

  • कंटेनमेंट झोनमधील राज्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. सर्विलान्स सिस्टम मजबूत करावी लागेल.
  • जिल्हा प्रशासनाला केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
  • राज्यांना सूट देण्यात आली आहे की, त्यांनी आपली परिस्थिती पाहता स्वतः निर्बंध लावावे.
  • सर्व जिल्ह्यात तयार होणाऱ्या कंटेनमेंट झोनची यादी आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. हे आरोग्य मंत्रालयालाही सांगावे लागेल.
  • या झोनमध्ये लोकांचे येणेजाणे काटेकोरपणे थांबवावे लागतील. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि मेडिकलसाठी सूट देण्यात येईल.
  • कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी पाळत ठेवणारी पथक घरोघरी जातील. प्रोटोकॉलच्या हिशोबाने टेस्टिंग केली जावी.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येत असलेल्या लोकांची यादी असावी. त्यांना ओळख काढून त्यांना ट्रॅक करावे आणि अलग ठेवणे आवश्यक आहे.
  • संक्रमित व्यक्तीवर त्वरित उपचार सुरु केले पाहिजेत. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे. आवश्यक असल्यास, रुग्णालयात दाखल करण्यात यावे.
  • ILI आणि SARI प्रकरणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि मोबाइल युनिट त्यांच्या संपर्कात असावेत.
  • स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिस हे निर्बंधाची अंमलबजावणी आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी घेतील.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments