मुंबई : बॉलीवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली असून, कनिकाच्या पार्टीत माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, यांचा मुलगा खासदार दृष्यंत सिंह उपस्थित होते. कनिकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे वसुंधराराजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत: क्वारंटाइन करुन घेतलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुछ दिन पहले दुष्यंत और उनके ससुराल वालों के साथ मैं लखनऊ में एक डिनर पर गयी थी। कनिका कपूर, जो कि #Covid19 संक्रमित पाई गई हैं, वें भी उस डिनर में बतौर अतिथि मौजूद थीं।
सावधानी के तौर पर मैं और दुष्यंत सेल्फ़-आइसोलेशन में हैं और हम सभी आवश्यक निर्देशों का पालन कर रहे हैं।
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) March 20, 2020
गायिका कनिका १५ मार्चला लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनौला गेली होती. त्यानंतर तीने १०० लोकांना पार्टीही दिली होती. मात्र कनिकाला कोरोना झाल्याचे निश्चपन्न झाले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या शंभर लोकांचीही तपासणी होणार आहे. खा. दुष्यंत सिंह ह्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती. अशीही माहिती समोर येत आहे. परंतु, गायिक कनिकाच्या कुटुंबातील सर्वांची तपासणी केली जात आहे. भारतात २३० जणांना कोरोना झाला असून परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.