Tuesday, June 16, 2026
Homeदेशबोमन इराणींच्या बहिणीच्या घरी घरकामगार महिलेने केेले हात साफ

बोमन इराणींच्या बहिणीच्या घरी घरकामगार महिलेने केेले हात साफ

बंगळुरु : बंगळुरु पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची चोरी करुन पळणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही माहिला प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांची बहिण खुर्शीद इराणी हिचा घरी घरकाम करायची. काही दिवसांपूर्वी तिच्या घरातून १ कोटी रुपयांचे दागिने आणि ११ लाख रुपये रोख चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु असताना आरोपी महिलेला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आरोपी महिलेचं नाव मेरी अॅलिस असं आहे. ती गेल्या पाच वर्षांपासून खुर्शीदच्या घरी काम करत होती. काही दिवसांपूर्वी खुर्शीदच्या घरी चोरी झाली. विशेष म्हणजे चोरी झाल्यापासून घरकाम करणारी मेरीदेखील कामावर येत नव्हती. परिणामी पोलिसांचा संशय तिच्यावरच गेला. अन् पोलीस तिचा शोध घेऊ लागले.

अखेर मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने बंगळुरु येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्यासोबत तिचा २२ वर्षांचा मुलगा मायकल देखील होता. त्यांच्याकडून १ कोटी रुपयांचे दागिने आणि ११ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले. सध्या दोघंही पोलीस कोठडीत आहेत.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments