Wednesday, April 30, 2025
Homeदेश२०१४ मध्ये मोदींनी केवळ 'प्रॉमिस' टुथपेस्ट विकली- प्रकाश राज

२०१४ मध्ये मोदींनी केवळ ‘प्रॉमिस’ टुथपेस्ट विकली- प्रकाश राज

बंगळुरू – कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सभा झाली. या सभेमध्ये पंतप्रधानांनी आश्वासनांची खैरात वाटली. मोदींच्या या सभेतील भाषणावर आज अभिनेते प्रकाश राज यांनी टीका केली.

सरकारने आश्वासनांची ‘प्रॉमिस’ टुथपेस्ट २०१४ मध्ये विकली मात्र देशातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या व सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यास अपयशी ठरले. अशा शब्दात ट्विटरवरुन निशाणा साधला. अशीच ‘प्रॉमिस’ टुथपेस्ट मोदींनी रविवारच्या रॅलीमध्ये विकली. तुम्ही ती घेणार का ? अशा शब्दात प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला.
रविवारच्या सभेमध्ये मोदींनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.  भाजपला ९० दिवसांचा अवधी द्या कर्नाटकचा कायापालट करु असे विधान यावेळी मोदींनी केले. तसेच कर्नाटकच्या विकासासंदर्भात अश्वासने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments