Tuesday, June 16, 2026
Homeदेशदेशात नव्या कोरोनाचे 25 रुग्ण सापडले

देशात नव्या कोरोनाचे 25 रुग्ण सापडले

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे जगसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा काही दिवसांपूर्वी भारतात शिरकाव झाला होता.देशाच्या राजधानीत व्हायरसच्या नव्या प्रकाराने धूमाकुळ घातला. दिल्लीतील कोरोनाबाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात व्हायरसच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली आहेत. आतापर्यंत देशात नव्या कोरोनाचे 25 रुग्ण सापडले आहेत.

दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेले ११४ प्रवासी पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली. तरीही नव्या करोनानं भारतात पाऊल ठेवलं. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले.

आतापर्यंत देशात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन प्रकार आढळून आला.

हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला. त्यामुळे एकूण सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याची माहिती होती. त्यानंतर आता यात नव्याने चार रूग्णांची भर पडली आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments