Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार म्हणाले, निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय!

अजित पवार म्हणाले, निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय!

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भाजपा नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावला. पुण्यात सर्किट हाऊस येथे अजित पवार  आले होते.

“ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

निलेश राणे म्हणाले
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं आहे. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं त्यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments